वृक्षरोपण मोहीम
“वसा”
ग्रामपंचायत बोराडी व ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभातुन बोराडी परिसरात दरवर्षी मोठ्या पातळीवर वृक्षरोपण मोहीम राबवत असुन प्रत्येक वर्षी पावसाळ्यापुर्वी पुर्वतयारी करून वृक्षरोपण केले जाते.महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल या विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानात बोराडी ग्रामपंचायत हिरेरीने सहभाग नोंदवते या अनुषंगाने व भुमी या तत्वात उल्लेखनिय काम म्हणजेच वृक्षरोपण करून विविध ठिकाणी हरीत क्षेत्रे तयार करून त्यांची देखभाल सामाजिक संस्था ग्रामपंचायत यांच्या विद्यमानाने वृक्षसंपदेची संवर्धन करण्यात येते या हरीत क्षेत्रात कडुनिंब,वड,पिंपळ,शिसू,बांबु,पळस,खैर,गुलमोहर, बहवा,पापडी इ.वृक्षाचे वृक्षरोपण होत असते. वृक्षरोपणाचा “वसा” थोर समाजसुधारक कर्मवीर स्वा.सेनानी ,शिक्षणमहर्षी कर्मवीर आणासाहेब व्यंकटरावजी तानाजी रणधीर यांच्या विचारांच्या ठेवीतुन मिळालेला असुन तोच वसा घेवुन धुळे जिल्हा परिषदेचे मा.जि.प.अध्यक्ष तथा कि.वि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.भाऊसो.डॉ.तुषारजी रंधे व प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियानचे धुळे जिल्हा अध्यक्ष,तथा बोराडीचे उपसरपंच आबासो. राहुलजी रंधे,सरपंच दादासो.सुकदेव भिल,सर्व ग्रा.पं.सदस्य ग्रामसेवक,भाऊसो.राजेंद्र साळुंखे यांच्या प्रयत्नातुन परिसरातील वृक्षसंपदा बळकट होत आहे

