बोराडी बाजारपेठ मोठी आहे सर्वत्र स्वच्छता असावी व कचऱ्याचे सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण करण्यास दुकानदारांना सोपे जावे या करीता बोराडी ग्रामपंचायतीने कचराकुंडी चे वाटप केले आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा होत नाही
गाव स्वच्छ,प्रदूषणमुक्त राहण्यासाठी गावाचे कचरा व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक असते. त्याबाबत सुचना दुकानदारांना केल्या आहेत.व बोराडीत कचरा संकलनसाठी ग्रामपरिषदेने ईलेक्ट्रिक कचरागाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. यांच्या माध्यमातून कचरा संकलीत केला जातो व त्याचे वर्गीकरणासाठी घनकचरा व्यवस्थापन केंद्रात पाठवीला जातो.याकरीता ग्रामपंचायतीचे कुशल मार्गदर्शक धुळे जि.प.मा.अध्यक्ष तथा कि.वि.प्र.संस्थेचे अध्यक्ष भाऊसो.डॉ.तुषारजी रंधे,प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत संघटनेचे धुळे जि.अध्यक्ष तथा बोराडीचे उपसरपंच आबासो. राहुलजी रंधे ,सरपंच दादासो.सुकदेव भिल ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक श्री. राजेंद्र साळुंखे प्रयत्नशील आहेत

वृक्षरोपण मोहीम
वृक्षरोपण मोहीम “वसा”ग्रामपंचायत बोराडी व ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभातुन बोराडी परिसरात दरवर्षी मोठ्या पातळीवर वृक्षरोपण मोहीम राबवत असुन प्रत्येक वर्षी पावसाळ्यापुर्वी
