बोराडी ग्रामपंचायत अंतर्गत पर्यावरण दिवस उत्साहात संपन्न झाला.यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे होते तर सरपंच सुकदेव भिल,धुळे-नंदुरबार ग.स बँकेचे संचालक शशांक रंधे,सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य इ.उपस्थित होते.बोराडी ग्रामपंचायतने सुमारे साडेपाच हजार कापडी पिशव्या तयार करून गावातील नागरिक,दुकानदारांना वाटप केले जेणेकरून प्लास्टिक कॅरीबॅग,प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होऊन प्रदूषण टाळता येईल म्हणून या पिशव्यांचे वाटप करण्यात आले.व प्लास्टिक कॅरीबॅग,प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करणार नाही अशी नागरिकांकडुन शपथ घेण्यात आली.गुरुवारचा बाजार असल्याने खेड्यापाड्यातुन बाजारासाठी लोकं येतात त्यांनाही माझी वसुंधरा अभियानांतर्गत कापडी पिशव्या देण्यात आल्या तसेच, बाहेरगावच्या व गावातील व्यापारी,भाजीपाला दुकानदारांनाही प्लास्टिक कॅरीबॅग,पिशव्या न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वृक्षरोपण मोहीम
वृक्षरोपण मोहीम “वसा”ग्रामपंचायत बोराडी व ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभातुन बोराडी परिसरात दरवर्षी मोठ्या पातळीवर वृक्षरोपण मोहीम राबवत असुन प्रत्येक वर्षी पावसाळ्यापुर्वी
